पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

App Check केलं, Loss दिसला?, Returns कमी दिसतायत? – घाबरू नका, हीच गुंतवणुकीची संधी!

✨ नमस्कार मित्रांनो आपण सगळे गुंतवणूकदार SIP सुरू करताना मनाशी ठरवतो – “हे ५–६ वर्षं किंवा त्याहून जास्त काळ चालू ठेवायचं.” पण तंत्रज्ञानामुळे अॅप आपल्या मोबाईलमध्ये आलंय आणि आपण जवळपास रोजच परतावा पाहतो. कधी कमी दिसतो, कधी निगेटिव्ह (-) परतावा दिसतो. कधी कधी परतावा चांगला दिसतो, आणि मनात लगेच त्या पैशाची कल्पना येते – “माझ्याकडे इतके पैसे आहेत, आता काहीतरी मोठं खरेदी करू शकतो.” अशा temptations मुळे अनेकदा लोक आपली दीर्घकालीन SIP funds काढून वापरतात, आणि त्यांचे भविष्यातील उद्दिष्ट धोक्यात येते. Mutual Fund Distributors ना ही माहीत आहे की गुंतवणूकदार अॅप पाहून घाबरतात. खरंतर त्यांना अॅप देणं फारसे आवडत नाही, पण स्पर्धेमुळे देणं आवश्यक आहे. 💡 LIC पॉलिसी प्रमाणे विचार करा – LIC मध्ये पैसे १०–२० वर्षांनी मिळतात, पण रोज तपासता येत नाही. संयम ठेवून लोक प्रतीक्षा करतात. SIP मध्येही तसेच – अॅप आहे म्हणून रोज पाहायची सवय लागते, पण संयम ठेवल्यासच खरा फायदा मिळतो. 📉 १. कमी परतावा दिसतो तेव्हा काय समजायचं? सुरुवातीच्या १–२ वर्षांत SIP ला जास्त परतावा मिळत नाही. कारण बाजार सतत चढ-उतार करत अ...